मुख्य संपादक महाराष्ट्र लेखणी फकीरचंद पाटील
पाचोरा शहरातील बालमित्रांसाठी आणि लहान मुलांसाठी खेळासोबत मनसोक्त आनंद लुटण्याचे नवे ठिकाण म्हणून गिरणा पंपिंग रोडवरील गोकुळधाम सोसायटीजवळ असलेले ‘PMJ ॲडव्हेंचर पार्क’ सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे.
अभ्यास आणि मोबाईलच्या स्क्रीनपासून दूर राहून लहान मुलांना मोकळ्या वातावरणात खेळता यावे, शारीरिक हालचालींसह नवीन खेळ शिकता यावेत यासाठी हे पार्क अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आकर्षक रचना, सुरक्षित खेळणी आणि मुलांच्या आवडीचे वातावरण यामुळे बच्चेकंपनी येथे मनमुराद आनंद घेत असून, पालकांसाठीही सुटीच्या दिवशी मुलांसोबत हक्काचा वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरत आहे.
- प्रमुख वैशिष्ट्ये: लहान मुलांसाठी सुरक्षित खेळणी, मनोरंजक रचना आणि कौटुंबिक वातावरण
- ठिकाण: गिरणा पंपिंग रोड, गोकुळधाम सोसायटीच्या बाजूला, पाचोरा
- अधिक माहितीसाठी संपर्क: संदीप जैन (९८६०३८८६५८),
- अमोल जैन (९२७०५०४७८५)







