5.3 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

पाचोरा व भडगाव मतदारसंघाच्या आढावा बैठकीत महावितरणच्या कारभारावर संताप; पालकमंत्र्यांसह आमदारांची कडक तंबी ​

 पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील विकासकामांचा आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले थे. या बैठकीत महावितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढण्यात आले असून, शेतकरी व नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याबाबत तंबी देण्यात आली आहे. तसेच वनविभागाच्या कारभारावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

​बैठकीतील प्रमुख मुद्दे व घडामोडी:

  • ​वनविभागाच्या कारभारावर जिल्हाधिकाऱ्यांची कडक तंबी: आढावा बैठकीत जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली. आतापर्यंत झालेली वृक्ष लागवड तसेच प्रत्यक्ष किती वृक्ष जिवंत आहेत, याचा सविस्तर अहवाल त्यांनी वनविभागाकडे मागितला आहे.
  • ​बिबट्याच्या संदर्भात वनविभागाचा हलगर्जीपणा: पाचोरा व भडगाव ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ग्रामस्थांनी फोन करूनही वनविभागाचे अधिकारी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नसल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत खडेबोल सुनावत तातडीने कारवाईची तंबी दिली.
  • ​महावितरणच्या कारभारावर कडक ताशेरे: ग्रामीण आणि शहरी भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या आणि लाईट अभावी जनता त्रस्त असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत समोर आल्या. अनेक दिवसांपासून जळालेले शेतीविषयक ट्रान्सफॉर्मर (रोहित्रे) बदलून न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना वणवण भटकंती करावी लागत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पालकमंत्री व आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली.
  • ​आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आक्रमक पवित्रा: शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी कायदा हातात घेईल, असे प्रतिपादन पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बैठकीत केले.
  • ​लाडकी बहीण योजनेबाबत शासनाची कटिबद्धता: लाडकी बहीण योजनेवर लवकर विचार करून, ज्या महिलांची केवायसी (KYC) झालेली नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत केले.
  • ​पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही: बैठकीत घरकुल योजना, अतिक्रमण नियमितीकरणाचा प्रश्न, सुकी नदी पात्रास नगर भूमापन क्रमांक देणे तसेच पाचोरा व तारखेडा भू-संपादनाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली.
  • ​अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहण्याच्या सक्त सूचना: मतदारसंघात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी योग्य नियोजन करावे आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या निर्धारित मुख्यालयातच थांबले पाहिजे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
  • ​पाणी बचतीचे आवाहन: दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी दोन दिवसाआड पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना ग्रामीण भागातील सरपंचांना देण्यात आल्या आहेत.

​बैठकीला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:

​या आढावा बैठकीस पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, तसेच पाचोरा व भडगावचे तहसीलदार, महावितरण, कृषी, उप प्रादेशिक, वनविभाग व पंचायत समिती विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, नगरपालिका गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोरजी बारावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!