5.3 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

पाचोऱ्यात ‘नादब्रह्मा इडली’चा भव्य शुभारंभ; २२ सप्टेंबरला उद्घाटन सोहळा

पाचोरा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, हॉटेल भाग्यलक्ष्मीच्या बाजूला ‘नादब्रह्मा इडली’ या नव्या खाद्यदालनाचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हा उद्घाटन समारंभ होणार आहे.
‘एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट…!’ या घोषवाक्यासह ‘नादब्रह्मा इडली’ने पाचोरा शहरात प्रवेश केला असून, भारतातील नं. १ ब्रँड असा उल्लेख निमंत्रणपत्रिकेत करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी पाचोरा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती सुनीताताई किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी, उद्योजक तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रण श्री. शरद हिरामण पाटील व सौ. शितल राहुल पवार यांनी दिले आहे.
विशेष म्हणजे उद्घाटनाच्या निमित्ताने ‘Free इडली’ – सायं. ४ ते ६ वाजेपर्यंत अशी विशेष ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाचोरा शहरातील इडलीप्रेमींसाठी या नव्या खाद्यदालनाचे उद्घाटन आकर्षणाचा विषय ठरणार आहे.
📍 स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, हॉटेल भाग्यलक्ष्मीच्या बाजूला, पाचोरा
📅 दिनांक : मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
⏰ उद्घाटन : सायंकाळी ७ वाजता
🍽️ विशेष ऑफर : सायं. ४ ते ६ – Free इडली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!