पाचोरा-भडगाव | प्रतिनिधी
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. बागायतदारांसह कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या नुकसानीचा मोठा फटका बसला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, यासाठी शेतकरीपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.
या पाठपुराव्यानंतर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ४५ कोटी ४८ लाख ७६ हजार रुपये अनुदान जमा होणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मदत उपलब्ध होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.







