महाराष्ट्र लेखणी
पाचोरा-
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 16 वी राष्ट्रीय परिषद शनिवार दि. 14 नोव्हेंबर 2026 रोजी पंढरपूर येथे संपन्न झाली. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई ) कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री जयदीप पाटील यांना इंदोर येथील होळकर संस्थांचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या शुभहस्ते “महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक” पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी काँग्रेस कमिटी सहकार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. शुभांगी शेरेकर, प्रबोधनकार ह.भ.प. संतसेवक बंडोपंत महाराज ढाकणे, परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. रवींद्र चव्हाण, सौ. जयश्री चव्हाण, सौं नूतन पाटील, कु. किरण पाटील, डॉ. पंकज शिंदे, गुणवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री जयदीप पाटील यांना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल विश्वासराव पवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराजे पवार, सेक्रेटरी सौ. रुपालीताई जाधव पवार, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.







