5.3 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

पाचोरा गोकुळधाम सोसायटी गणेश मित्र मंडळाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

दिनांक 25/9/2026
पाचोरा : गिरणा पंपिंग रोड परिसरातील गोकुळधाम सोसायटी येथे यंदा उत्साहात स्थापन करण्यात आलेल्या गोकुळधाम सोसायटी गणेश मित्र मंडळाच्या गणरायाला शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी सोसायटीतील रहिवासी, महिला मंडळ तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान बालगोपालांनी गणेशाच्या विविध गाण्यांवर ताल धरत उत्साहात सहभाग घेतला. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला.‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’**च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गोकुळधाम सोसायटी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष फकिरचंद पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ एरंडे, सचिव योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिल महाजन, एकनाथ महाजन, प्रमोद महाजन, गोपाल पाटील, अशोक चौधरी (पोलीस), श्रीराम पाटील महाजन (पोलीस), उमेश देसले (मामा), देवीलाल भिवसणे, प्रल्हाद महाजन, निकम भाऊसाहेब, विकास महाजन, सुभाष महाजन, बंटी मोर, निवृत्ती शेजवळ, समाधान महाजन, निमिश कुलकर्णी स्वप्निल पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध उपक्रमांमधून एकता, सामाजिक सहभाग आणि भक्तीभावाचे दर्शन घडले. अखेर पारंपरिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत भावुकता होती, तर पुढील वर्षी पुन्हा त्याच उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!