4.4 C
New York
Saturday, November 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी सुमित किशोर आप्पा पाटील यांचा अर्ज मंजूर;पाचोऱ्यात शिवसेनेचा जल्लोष!

 

भाजपचे सतीश बापू शिंदे यांनी घेतलेल्या हरकतीवर निर्णय; अर्ज मंजूर होताच शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव
पाचोरा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरील हरकतीचा अखेर निकाल लागला आहे. भाजपचे सतीश बापू शिंदे यांनी सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. मात्र, संबंधित हरकतीवर निर्णय देताना निवडणूक निर्णय प्रक्रियेत त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.
या निर्णयाचे वृत्त पाचोऱ्यात धडकताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निर्णयाच्या निमित्ताने पाचोरा शहरात शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला.
या आनंदोत्सवाला पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, नगरपालिकेचे नगरसेवक, शिवसेनेचे विविध पदाधिकारी तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला मिळालेली मंजुरी हा शिवसेनेसाठी उत्साह वाढवणारा निर्णय ठरला असून, या निमित्ताने पाचोरा शहरात शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!