6.4 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

आदिवासी पाड्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी साजरी केली दिवाळी! ‘

‘
दिवाळी आशेची, साथ शेतीशाळेची

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे आणि निराशेतून आशेकडे नेणारा उत्सव! याच भावनेतून जिल्हाधिकारी यांनी आदिवासी पाड्यावर शेतकरी आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अडचणी, स्वप्ने व अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच आदिवासी भागातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या शेतीविषयक व इतर समस्या समजून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

शेतीशाळेतील शेतकरी, पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी व महसूल विभागाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतीविषयक उपयुक्त साहित्य, दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे, चारा बियाणे, ठिबक सिंचन संच तसेच अवजारे बँकेच्या माध्यमातून शेती उपयोगी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!