महाराष्ट्र लेखणी
सचिवपदी नंदकुमार शेलकर, उपाध्यक्षपदी प्रवीण बोरसे; कार्यकारिणी जाहीर
विशेष प्रतिनिधी : पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मराठी पत्रकार विकास असोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निर्भीड पत्रकार राहुल महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी प्रवीण बोरसे, तर कार्याध्यक्ष तथा सचिवपदी नंदकुमार शेलकर यांची निवड झाली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी
१. अध्यक्ष – राहुल महाजन
२. उपाध्यक्ष – प्रवीण बोरसे
३. कार्याध्यक्ष तथा सचिव – नंदकुमार शेलकर
४. सहसचिव – चिंतामण पाटील
५. प्रसिद्धीप्रमुख – अन्वर शेख
कार्यकारिणी सदस्य
१. निखिल मोर
२. प्रमोद बारी
३. प्रमोद पाटील
४. संदीप परदेशी
५. प्रदीप महाले
६. दीपक पवार
७. दिलीप चौधरी
८. बाबुलाल पटेल
९. अशोक चौधरी
१०. बंडू सोनार
११. छोटू सोनवणे
१२. फकिरचंद पाटील
पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटित लढा!
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. मात्र, पत्रकारांना अनेकदा आर्थिक अडचणी, असुरक्षितता आणि विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे न्याय्य हक्क, सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्य करणार आहे.
संपादक, वार्ताहर, छायाचित्रकार, श्रमिक पत्रकार तसेच वृत्तपत्र वितरण करणाऱ्या बांधवांच्या हिताचे संरक्षण करणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.
राज्यभर संघटनेचा विस्तार करणार!
येत्या काळात शहर, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर संघटनेचा विस्तार करण्यात येणार असून पत्रकारांसाठी सदस्य नोंदणी अभियानही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पत्रकारांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आणि पत्रकारितेचा सन्मान जपणे यासाठी संघटना कटिबद्ध राहणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल महाजन यांनी दिली.
पत्रकारांच्या एकजुटीला बळ देत त्यांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक विकासासाठी मराठी पत्रकार विकास असोसिएशनची ही नवी कार्यकारिणी निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







