5.3 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

माणुसकीचा धर्म जपणारे नगरदेवळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगे साहेब

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; अभिलाष मित्रपरिवाराचा पुढाकार
पाचोरा तालुक्यातील गाळण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगे साहेब तसेच अभिलाष मित्रपरिवार यांच्या वतीने पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. वाढत्या उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पक्ष्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था करून एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
पक्षी, प्राणी आणि निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. माणुसकी केवळ माणसांपुरती मर्यादित नसून मुक्या जीवांप्रतीही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक गंगे साहेब आणि अभिलाष मित्रपरिवार यांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेमुळे ‘माणुसकीचा धर्म कसा जपावा’, याचे जिवंत उदाहरणच गाळण येथे पाहायला मिळाले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, इतरांनीही पक्षी व मुक्या जीवांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!