5.3 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

पाचोऱ्यात उद्या शिवसेनेच्या बच्चू कडू यांचा शिवसंवाद दौरा

शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद*

पाचोरा, दि. २३ :
संघटन बांधणीच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरसावली असून त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री, विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. २४) पाचोरा येथे ‘शिवसंवाद दौऱ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता जुना सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.
शेतकरी, गोरगरीब, दिव्यांग तसेच विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांशी बच्चू कडू,लोकसभा संपर्क प्रमुख आमदार दिलीप लांडे,पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे संवाद साधणार असून, विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमास जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार दिलीपमामा लांडे यांचेसह रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार तुकाराम काते तसेच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती लाभणार आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांचे वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!