रविवार दिनांक २१/ ९ /२०२५ रोजी रात्री बारा वाजेपासून जोरदार पाऊस पाचोर्यात सुरू आहे पाचोरा येथील हिवरा नदीला पूर आला असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नगरपालिका टीम सज्ज झाली आहे काही घरांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाकडून मदतीची हाक तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यासह मका व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे







